
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या २८ जून रोजी होणार आहे.त्या पार्शवभूमीवर संत तुकाराम देवस्थान संस्थान च्या वतीने तयारी करण्यात येत असून ,संत तुकाराम महाराज ,यांची चांदीची पालखी व रथास चकाकी देण्याचे काम गुरुवार ( ता.२०) पासून सुरू करण्यात आलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हे गाव चांदीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असून याच गावचे २७ व्यापारी स्वतःचा व्यवसाय बंद करून , संत तुकाराम महाराजांच्या पालखी ,रथ तसेच तत्सम साहित्याला सुधारित आणि परंपरागत साहित्य वापरून चकाकी देण्याचे सेवाभावी वृत्तीने करू लागले आहेत.
या साहित्याला अवघ्या २४ तासात चकाकी देण्याचे काम करणार पूर्ण
संत तुकाराम महाराज चांदीची पालखी ,चांदीचा रथ ,अब्दागिरी ,संत तुकाराम महाराजांचा मुखवटा , पूजेचा कलश , ताम्हण ,तांब्या ,पळी , चमचा , गरुड टक्के , गरुड हनुमंत यांच्या मूर्ती ,तसेच तत्सम साहित्य ,आणि मुख्य मंदिरा मधील विठ्ठल रखुमाई ,आणि शिळा मंदिरातील ,संत तुकाराम महाराज यांच्या माघील बाजूस असणारी प्रभावळ यांना अवघ्या २४ तासाच्या आत अगदी विनामूल्य चकाकी देण्याचे काम बाबासाहेब गोंधळी ,अभयसिंह घोरपडे ,युराज माने ,सुनील केंगळे, आनंदा भडगावे, सचिन पिसाळ ,सिद्धू नायकवडे आदी एकूण २७ चांदीचे व्यापारी हे काम पूर्ण करणार आहेत.
*चकाकी करण्यासाठी सुधारित आणि परंपरागत रसायनाचा वापर*
कोलगेट , पावडर ,उकाडा ,पोटॅश पावडर अशी रसायने व सुधारित आणि परंपरागत साहित्याचा वापर करून हे लकाकी देण्याचे काम केले जाते.या व्यवसायिकांनी पंढरपूर मंदिरात चांदीच्या वस्तूंना चकाकी देण्याचे काम सलग ५ वर्षे केले आहे.या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांची सेवा करण्याची संधी आमच्या हुपरी गावच्या चांदीच्या कारागिरांना मिळाली.हे आम्ही आमचे थोर भाग्य समजतो.
बाबासाहेब गोंधळी
चांदी कारागीर हुपरी जिल्हा कोल्हापूर