
समता दिंडीतून राजर्षी छत्रपती शाहू विचारांचा जागर !
समाज कल्याण विभागाचा उपक्रम
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीदिनी सामाजिक न्याय दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथून समता दिंडीला सुरुवात झाली.
समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, लातूर जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तेजस माळवदकर, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त कार्यालयातील समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, उपशिक्षणाधिकारी मधुकर ढमाले यावेळी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समता दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संविधान, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आदी विषयावर संदेश देणारे फलक हाती घेत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची माहिती दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथून निघालेली ही दिंडी गंजगोलाई, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, महात्मा गांधी चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर दिंडीचा समारोप करण्यात आला. ज्ञानेश्वर विद्यालय, यशवंत विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, देशिकेंद्र विद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, राजस्थान विद्यालय, परिमल विद्यालय, व्यंकटेश विद्यालय आणि कृपासदन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
सकाळी सात वाजता शाहू विद्यालयातून छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयाच्या गेटपासून आणि एक पथक सामाजिक बांधिलकी, शाहू महाराजांचे संदेश देणारे स्काऊट गाईड पथक, त्यानंतर वृक्षारोपण दिंडी, ग्रंथ दिंडी, महाराजांच्या विचारांची अनेक बॅनर व शाळेतील पारंपारिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनी यांच्या पथकासह सामाजिक संदेश देणारी दिंडी काढण्यात आली.ही दिंडी छत्रपती शाहू महाराज चौकात प्रथमता आणण्यात आली आणि त्यानंतर ऐतिहासिक वारसा असलेल्या उदगीर शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व तसेच मराठा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या राजर्षी शाहू विद्यालय उदगीर व विश्वनाथराव चलवा विद्यालय सर्व कर्मचारी विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी होऊन शाहू महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पूजन करून मानवंदना दिली व पूजन करून शाहू चौकात वारकरी संप्रदायाच्या पथकाने संतांचा संदेश त्या सोबतच राहून चौकात महाराष्ट्र गीत,संतांचे अभंग, व संतांच्या विचाराची जाणीव करून दिली. त्यानंतर रॅली राजर्षी विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॅप्टन प्राचार्य चंद्रसेन मोहिते सर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री बाबुरावजी नवटक्के, ऋषिकेशजी जाधव, कांतरावजी रोडगे, गोविंदरावजी निटुरे, तसेच आवर्जून उपस्थित असलेले सामाजिक न्याय दिनाची दिनानिमित्त निवृत्ती न्यायमूर्ती राजेंद्र मुळे उपस्थित होते.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचाही पालकासह गौरव करण्यात आला. आज समाजाला शाहू महाराजांच्या विचाराची आचारांची आणि एक समतेचा संदेश देणारा राजा यांची गरज सर्वांनी जोपासावी सामाजिक जाणीव ठेवावी असा संदेश अनेक उपक्रम घेऊन समाजाला आणि विद्यार्थ्यांना देण्यात आला त्याच वृक्ष दिंडी वृक्ष लागवड यातून नैसर्गिक संपन्नता याचा संदेश देण्यात आला.वारकरी पथकातून संतांच्या विचाराचं सामाजिक गरज सांगण्यात आली त्यासोबतच रक्तदान शिबिर आयोजित करून शेकडोंच्या संख्येने शाळेतील कर्मचारी पालक आणि समाज प्रेमींनी रक्तदान करून योगदान दिले. त्याप्रसंगी मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदसिद्ध पदाधिकारी शाळेतील सर्व कर्मचारी नागपा अंबरखाने ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित राहून सहकार्य केले या कार्यक्रमाचे संचलन बिरादार एस.ए.यांनी तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याणे एस.टी यांनी मानले व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.