
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व दुष्काळाचे सावट होते त्यासाठी राज्य शासनाने जी मदत जाहीर केली होती. ती मदत आपल्या इंदापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली आहे.परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत.हि मदत लवकरात लवकर वर्ग करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यलयापुढे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने इंदापूर चे तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मागील काळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका, ऊस, कांदा तसेच कपाशी व इतर सर्व पिकांचे
मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. त्या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून नुकसान भरपाई मिळावी यासाठी निर्णय घेतला होता व पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या
महसूल व वन विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले होते.
त्यामुळे सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
मदतीची अपेक्षा निर्माण झाली होती. सध्या खरिपाच्या पेरण्यांनी वेग पकडलेला असून व शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बियाणे व खते इत्यादी घेण्यासाठी चिंतेत असून वरील प्रमाणे राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मदत तातडीने शेतकऱ्यांच्या
खात्यात वर्ग केल्यास त्यास खरीप हंगामासाठी बियाणे व खते
घेण्यास आर्थिक मदत होणार आहे.
येत्या काही दिवसांत सर्व शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यात वर्ग न केल्यास दि.३१ जुलै पासून इंदापूर तहसील कार्यालयाबाहेर इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीनुकसान भरपाई प्रत्यक्ष्यात मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा इंदापूरचे तहसीलदार यांना इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख शरदजी सुर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख संजय काळे, जिल्हा समन्वयक भिमराव भोसले, तालुका प्रमुख नितीन शिंदे,माजी तालुका प्रमुख योगेश कणसे, इंदापूर तालुका संघटिका सुजाता सोनावने पाटील, युवासेना तालुका युवाधिकारी सचिन इंगळे, युवा सेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप तसेच इंदापूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.