
दै. चालु वार्ता, शहर प्रतिनिधी, प्रा. विजयकुमार दिग्रसकर
आज समस्त पवित्र पोर्टल वरील भरतीसाठी आलेल्या नवनियुक्त शिक्षकांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या माणुसकीचे अद्भूत दर्शन झाले.
झाले असे की जुन्नर तालुक्यातील हरीभाऊ दिगंबर विरणक या सरांच्या वडिलांचे निधन झाले असा मेसेज आला, सदर निरोप मा.सीईओ साहेबांना दिला स्वतः साहेब बाहेर येऊन त्या शिक्षकांना स्वतःच्या गाडीतून पोचविण्याचे नियोजन केले,
अशी व्यक्तिमत्त्व अपवादात्मक असतात, साहेबांच्या या कृतीला सलाम ,साहेब आम्ही खूप धन्य आहोत,की असे प्रमुख आमच्या zp ला मिळाले
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुरुवारी 27 जून रोजी सर्किट हाऊस येथे शिक्षक भरतीची प्रक्रिया आयोजित केली होती. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापनासाठी बोलावले होते. समुपदेशनाने पदस्थापना करण्यात येत आहे.
समुपदेशन द्वारे पदस्थापनेची प्रक्रिया सुरू असताना शिक्षक हरीभाऊ दिगंबर विरणक यांच्या वडिलांचे निधन झाले असा मेसेज आला. समुपदेशन साठी आलेल्या शिक्षकांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती सीईओ कार्तिकेयन एस यांना समजली. मुख्य कार्यकारी अधिकारी सभागृहाबाहेर आले. त्या शिक्षकाचे सांत्वन केले. धीर दिला. आणि त्या शिक्षकांना स्वतःच्या गाडीतून पोहचविण्याचे नियोजन केले. स्वतः त्या शिक्षकाला घेऊन गाडीपर्यंत गेले. ड्रायव्हरला सूचना केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेमन एस यांनी दाखविलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि तत्परता या साऱ्या गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती .