
युवा नेते नवनाथ बापू चव्हाण यांची मागणी
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) चे युवा नेते नवनाथ (बापूसाहेब) रोहिदास चव्हाण यांनी केली आहे.
शिवसेना युवा नेते नवनाथ (बापूसाहेब) रोहिदास चव्हाण यांनी असे नमूद केले की, दोन्ही तालुक्यात शनिवार पासून धुवांधार असा पाऊस कोसळून शेतकन्यांच्या शेतातील उभ्याअसलेल्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठच्या जमीनी व पिके वाहून गेले. सखल भागात पाणी साचले, पिके पिवळी पडत आहेत. शेतीचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुग उडीद हातचे गेली असून सोयाबीन, कापूस, तुर आदी पिके पिवळी पडत आहेत. अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने त्यात अजून भर पडली आहे. शासनाने दोन्ही ओला दुष्काळ जाहीर करुन पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकन्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई अनुदान देण्याची मागणी शिवसेना उबाठाचे युवा नेते नवनाथ ( बापूसाहेब ) रोहिदास चव्हाण यांनी केली आहे.