
दैं. चालु वार्ता.
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी लोहा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, लोहा तालुक्यातील सर्व मंडळातील व गोदावरी नदी पट्ट्यातील भागात दि.१ ते ३ सप्टेंबर दरम्यान ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
तेव्हा यांचे तात्काळ पंचनामे करून लोहा शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आर्थिक अनुदान द्यावे अशी मागणी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील जोमेगावकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे, अकबर सय्यद,डी.एन.कांबळे,चांद पटेल, सेवा दलाचे उध्दव पाटील, माधव पाटील कदम,सतीश पाटील गोलेगावकर, संतोष पाटील नांदगावकर,जिलानी भाई रायवाडीकर, दिगांबर मेकाले, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.