
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
मराठवाड्याचे व कंधार तालूक्यातील दहिकळंबा या गावचे भूमिपुञ प्रा.डाॅ. बाळ राक्षसे यांची टाटा सामिजिक विज्ञान संस्था तुळजापूर कॅम्यस च्या डायरेक्टर पदी नियुक्ती झाली आहे. टाटा सामाजिक संस्था मुंबई ही सामाजिक विज्ञान आणि समाजकार्य या क्षेञात उच्च शिक्षण देणारी देशातील पहिली आणि अग्रगण्य संस्था आहे.सर दोराबजी टाटा यांच्या पुढाकाराने १९३६ मध्ये ही संस्था मुंबई मध्ये स्थापन झाली. त्यावेळी या संस्थेचे नाव सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कुल आँफ सोशल वर्क होते. त्यानंतर १९४४ मध्ये या संस्थेचे नाव टाटा सामाजिक विज्ञान संस्था असे झाले. त्यानंतर १९६४ मध्ये विद्यापिठ अनुदान आयोगाच्या १९५६ च्या कायद्यानुसार ही संस्था अभिमंत विद्यापिठ [डीम्ड युनिव्हर्सिटी] म्हणून मान्यता पावली आणि २०२२ मध्ये ही संस्था संपुर्ण भारत सरकारच्या शिक्षण मंञालयाच्या अधिपत्याखाली आली या संस्थेचे चार कॅम्पस आहेत मुंबई [मुख्य] ,तुळजापूर, गोहाटी आणि हैद्राबाद समाजकार्य आणि सामाजिक शास्ञामध्ये अनेक शाखांत पदवी पदव्युतर आणि पीएचडी पदवी देणारी एक नामाकित संस्था आहे. प्रा. डाॅ. बाळ राक्षसे यांनी अतिश्यय प्रतिकुल परिस्थितीमध्ये माध्यमिक व पदवी ,पदव्युतर शिक्षण घेतले त्यांचे पदवी आणि पदव्यूतर शिक्षण मिलिंद महाविद्यालयात पुर्ण करुन पुणे विद्यापिठातून मानसशास्ञ पीएचडी मिळवली बाळ राक्षसे आज पर्यंत मुंबई कॅम्पस मध्ये स्कुल आँफ हेल्थ सिस्टिम स्टडी मध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत होते १ आँक्टोबर २०२४ पासुन त्यांनी तुळजापूर कॅम्पसच्या डायरेक्टर पदाचा पदभार स्विकारला आहे. या उच्च पदावर जाण्याचे श्रेय त्यांची आई पार्वतीबाई नागोराव राक्षसे आणि त्यांच्या आर्धांगनी सौ.ललिताबाई बाळ राक्षसे यांनी अतिश्यय प्रतिकुल परिस्थितीमध्ये मेहनत घेवून काबडकष्ठ करुन त्यांच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहून साथ दिली. म्हणून बाळ राक्षसे यांना आज उच्च पदावर जाण्याचे यश मिळाले त्याचे श्रेय माझी आई आणि माझी आर्धांगनी यांना जाते. या नियुक्ती बद्दल नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, कंधार लोहा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आ. शंकर आण्णा धोंडगे, शिवसेना उबाठा गटाचे नेते एकनाथ दादा पवार, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, माजी नगराध्यक्ष दगडूभाऊ सोनकांबळे, अँड. बाबुराव पुलकुंडवार, माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, संत गाडगे बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दौलतराव केंद्रे, बाबुराव केंद्रे उमरगेकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्राचार्य किशनराव डफडे, प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे, भाजपा तालुका सचिव मधु पाटील डांगे,मुखेडचे माजी नगरसेवक प्रा.यशवंतराव कांबळे, राऊत्तखेडचे माजी उपसरपंच विलासराव आगबोटे, माजी मुख्याद्यापक सुधाकर कांबळे, सेवानिवृत साहाय्यक पोलीस निरीक्षक यादवराव सोनकांबळे, माजी जि.प.सदस्य रामचंद्र येईलवाड, संपादक रमेश चित्ते,प्रा. डाॅ.दिलीप सावंत, प्रा.डाॅ. डी.डी पवार, प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड,प्रा.डाॅ.रज्जाक कासार यांच्यसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.