
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनीधी -सुरेश ज्ञा.दवणे
राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजना आणि निर्णयाचा धडाका लावला आहे काही सरकारी पदाचे नावे बदलली आहेत ग्रामसेवक नाव बदलून त्यांचे ग्रामपंचायत अधिकारी नाव मागील आठवड्यात करण्यात आलेले आहे आता १४ऑक्टोंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तलाठी व कोतवाल पदाचे नाव बदल बदलण्यात आले आहे तलाठी यांना यापुढे ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाईल तर कोतवाल यांना महसूल सेवक म्हणून संबोधले जाणार आहे नवीन प्रकाशित शासन निर्णयानुसार आता तलाठी पदनाम ग्राम महसूल अधिकारी या नावाने संबोधले जाणार आहे नवीन प्रकाशित शासन निर्णयानुसार आता तलाठी पदनाम ग्राम महसूल अधिकारी या नावाने संबोधले जाणार आहे जिल्हाधिकारी याने नमूद केलेली नोंदणी पत्रके रजिस्टर व जमा खर्च लिहिण्याचे काम तलाठ्याकडे असते जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रक्कम त्यास गोळा कराव्या लागतात कोणत्याही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगेल त्या गावांमध्ये संबंधी लिहिण्याचे काम तलाठ्यास करावे लागते महसुली भागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्याद्वारे करण्यात येत होती महसुली भागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्यात आले आहे राज्यातील कोतवालांनी महसूल मंत्री लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करावे अशी मागणी केली होती राज्य शासनाच्या संमतीने कोतवाल पद हे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असल्याने कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात आले अशी शिफारस केली आहे त्यानुसार १४ ऑक्टोंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक असे करण्यात आले आहे