मुंबई : तब्बल 29 वर्षांनंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दाऊद प्रकरणाची एंट्री झाली, आधी गोपीनाथ मुंडे आणि आता प्रकाश आंबेडकरांनी संशयाची सुई शरद पवारांकडे वळविली आहे.1995 च्या निवडणुकीत शरद पवार आणि दाऊद इब्राहिम संबंधाबाबत गोपीनाथ मुंडेंनी प्रचंड गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर दाऊद प्रकरणाने शरद पवारांचा कायमच पिच्छा पुरविला. पवारांच्या राजकारणावर गुन्हेगारीचा कायमचा डाग लागला. 1995 ची निवडणूक पवारांना ते अखंड काँग्रेसचे नेतृत्व करत असताना गमवावी लागली होती. नंतर पवार कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सत्तेवर आले, तरी दाऊद इब्राहिमशी संबंधांचा डाग त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कायमचा चिकटलेला राहिला. नवाब मलिक हे त्याचे ताजे उदाहरण ठरले.
या पार्श्वभूमीवर आज 2024 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंतचा सर्वांत मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले होते, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी यांनी केला आहे. त्यांच्या या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्राचा राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
*प्रकाश आंबेडकर म्हणाले :*
1988-91 मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते परदेश दौऱ्यावर गेले होते त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. त्यांची मीटिंग कोणासोबत झाली. त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले. दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहिमशी विमानतळावर भेट झाली. तिथे दाऊदने शरद पवारांच्या गळ्यात सोन्याचा हार घातला होता.
1988-91 या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या सरकारची परवानगी होती का?? कारण तशी परवानगी असल्याशिवाय कुठल्याही मुख्यमंत्र्याला दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का?? शरद पवार यांना केंद्र सरकारने त्यावेळी परवानगी दिली असेल, तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण त्यांना दिली होती का?? त्या बैठकांचा अहवाल पवारांनी केंद्र सरकारला दिला होता का??, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील करावा.