[ रसिक प्रेक्षक यांना विनामूल्य प्रवेश ]
<span;> भोकर / नांदेड – नांदेड येथील सुरभी संगीत ग्रुप तर्फे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल म्युझिकल नाईट’ चे शनिवार दि.19 ऑक्टोबर 2024 रोजी कुसुम सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडे सहा वाजता सुरू होत असलेल्या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असेल.
<span;> या कार्यक्रमात संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक एकल व युगलगीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. प्रा. आर. के. देशपांडे , धिरज पौळ , संतोष कुलकर्णी , मंगेश पाटील क्षीरसागर, अनुप दाड , दिवाकर देशमुख , मिना सोलापुरे , प्रनोती बिलोलीकर, ज्योती खानजोडे व बालाजी उमरीवाड यांचा हिंदी गितांचा कार्यक्रम आयोजीत केला असून या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असल्याने या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी सभागृहात वेळेवर उपस्थित राहून संगीत श्रवणाचा लाभ घ्यावा असे कार्यक्रमाचे निर्माते प्रा. राजीव देशपांडे यांनी कळविले आहे.