
दै.चालु वार्ता
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
14 वर्ष वयोगटातील मुलींच्या 100 मीटर धावणे स्पर्धेत केतकी परमेश्वर पाटील प्रथम, 200 मीटर धावणे स्पर्धेत श्रुती शंकर भांगे प्रथम, 14 वर्ष मुली 4X100 मीटर रिले स्पर्धेत प्रथम ( केतकी पाटील,हर्षदा कोले,वेदिका कोळ्ळे,सायली देशमुख,श्रुती भांगे) या मुलींचा समावेश होता.
17 वर्षे मुली 4X100 मीटर रिले स्पर्धेत प्रथम ( समृद्धी मुसळे,तन्वी वाडकर,गायत्री तोगरगे, भाग्यश्री निलेवाड,अक्षरा दुरुगकर या मुलींचा समावेश होता ),
17 वर्ष वयोगटातील मुलींच्या 100 मीटर धावणे स्पर्धेत तन्वी राजू वाडकर द्वितीय आली असून या सर्व खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक संतोष कोले यांचे मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल संस्थेचे स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, स्थानिक कार्यवाह तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य शंकरराव लासुणे,विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले उपमुख्याध्यापक अरूण पत्की,पर्यवेक्षक कृष्णा मारावार किरण नेमट माधव मठवाले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.