
दैनिक चालु वार्ता
जेजुरी प्रतिनिधी संदिप रोमण.
पुरंदर : दि.20 पुरंदर हवेली विधानसभा निवडणुक लोकशाही संघर्ष संघटना प्रमुख अतुल उर्फ आतुलराज नागरे हे लढविणार असल्याचे त्यांनी दैनिक चालु वार्ताशी बोलताना सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले कि मी पुरंदरमधील मधील वीर तोंडल या गावचा रहिवासी आहे. त्यांनी जय लोकशाही, ध्यास राष्ट्रहिताचा हा लोकणारा करीत आत्ताची पुरंदर हवेली मतदारसंघात विधानसभा मी अपक्ष उमेदवार म्हणुन पुरंदर हवेलीतील मतदार जनतेच्या समोर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ना कोणता पक्ष ना कोणतेही गटातटाचे राजकारण ना कोणताच राजकीय वारसा फक्त सामान्य जनतेचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास घेऊन मी पुरंदर हवेली मतदार संघात एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील शेतकरी वर्गाची व शेतमालाला हमी भाव मिळावा , त्यांच्या अडिअडचणी ची पुर्ण जाणीव असलेली व त्यांच्या मुला मुलींची तसेच तरुण युवक युवतींच्या शिक्षण, आरोग्य, व्यवसाय व स्थानिक भूमिपुत्रांच्या कायमस्वरूपी च्या नोकऱ्या या व अश्या अनेक समस्या सोडण्याकरीता लोकशाही संघटनेच्या माध्यमातुन जय लोकशाही, ध्यास राष्ट्रहिताचा हा लोकणारा घेऊन पुरंदर हवेली मतदार संघातील जनतेसमोर येणार आहे. व त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पुन्हा एकदा ना कोणता पक्ष , ना गटातटाचे राजकारण, ना कोणताच राजकीय वारसा असे असताना फक्त सर्वसामान्य जनतेच्या समस्या आणि अडी अडचणी सोडविण्यासाठी व तरुण वर्गाला त्यांच्या शिक्षण, आरोग्य, तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या व स्वतःचे व्यावसाय बळकटी करणासाठी मदत करण्याचे स्वप्न उराशी बाळगुण या स्वार्थासाठी व आपले जवळचे राजकीय हितसंबंधी व नातेवाईक यांची मनधरणी करून जनतेला व विरोधकांना धारेवर धरत स्वार्थासाठी राजकारण करणार्यांना धडा म्हणुन मी पुरंदर हवेली विधानसभा निवडणुक लोकशाही संघर्ष संघटनेच्या माध्यमातुन अपक्ष उमेदवार म्हणुन लढविणार आहे.