
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
महाळुंगे
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत बिरदवडी फाटा (ता. खेड) येथे शनिवारी (दि.१९) मध्यरात्री हिताची कंपनीचे एटीएम मशीन फोडण्यात आले होते. ही माहिती मिळताच महाळुंगे पोलिसांकडून चोरट्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग करण्यात आला. एक स्कॉर्पिओ वाहन आणि ११ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल सोडून अंधाराचा फायदा घेत पाच ते सहा चोरटे पसार झाले.
या कामगिरीची दखल घेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक
जितेंद्र परदेशी, दत्तात्रय जाधव, पोलिस अंमलदार संतोष होळकर, युवराज बिराजदार, अशोक शेळके, पप्पू लोखंडे, विश्वास पाटील, अशोक गभाले, प्रकाश चाफळे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे, गणेश गायकवाड, अमोल माटे, तेजस खांडेकर, रामहरी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त
डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे २) बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते वडेकर गाडे उपस्थित होते.