
पुणे:महाविकास आघाडीतील ठाकरे गटातर्फे ६५ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली होती. ही यादी जाहीर झाल्यानतंर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांनी या यादीत थोडासा बदल होणार असल्याचे सांगितले होते…
वगण्यात आलेले हे नाव रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांचे आहे. धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदार संघातून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल मोटे यांचे नाव चर्चेत आहेत. ते सलग तीन वेळा परांडा विधानसभा मतदार संघातून आमदार राहिले आहेत.
अगोदरच ठाकरे गटाने एबी फॉर्म दिले..
महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होण्याअगोदर ठाकरे गटाने एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकृतपणे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर झाल्यानतंर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांनी या यादीत थोडासा बदल होणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीने ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला आहे. तर मित्रपक्षाला १८ जागा देण्यात येणार आहे.
८५-८५-८५ फॉर्म्युला…
महाविकास आघाडीने ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला आहे. तर मित्रपक्षाला १८ जागा देण्यात येणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत आदित्य ठाकरे, केदार दिघे यांच्याबरोबरच नाशिक मध्यचे माजी आमदार वसंत गीते, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर, निफाड – अनिल कदम, मालेगाव बाह्य – अव्दैय हिरे, नांदगाव – गणेश धात्रक, यांच्या नावाचा समावेश आहे…