
पुणे:राज्यात कोण होणार मुख्यमंत्री आणि कुणाची सत्ता येणार हे सद्यस्थितीत राजकीय खिचडी असल्याने आज तरी सांगता येणार नाही पण दुसरीकडे काही सर्व्हे येत आहे त्यामुळे आपण कुणाची राज्यात हवा आहे हे सांगू शकतो.
या सगळ्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात लोकनिती सीएसडीएसने सर्व्हे केला आहे. त्यातून काही अंदाज बांधण्यात आले आहेत.
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रत्येक पक्ष विजय पदरात पाडण्यासाठी कसोशीने तयारी करत आहे. अशातच झालेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आले. त्यात हरियानात काँग्रेसला विजय मिळेल असे वाटत असतानाच भाजपच्या हाती सत्तेची चावी आली. त्यामुळे महाविकास आघाडी हळूच आणि सावधगिरीने पावले उचलत आहेत. तर दुसरीकडे कोणताही पक्ष धोका होणार नाही याची खबरदारी घेत आहे.
राज्यात खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणती हे जनता या निवडणुकीत ठरवणार आहे. यामुळे फुटलेल्या दोन पक्षांचे चार पक्ष झाले. आता या सर्वांच्या भविष्याची ही लढाई आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण आणि महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. याबाबत लोकनीती-सीएसडीएसने याबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात लोकप्रिय मुख्यमंत्री उमेदवारांवर लोकांना प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणात लोकांची उत्तरे प्राप्त झाली आहेत.
काय सांगतो सर्व्हे
१.लोकनीती सीएसडीएसच्या सर्वेक्षणात, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे लोकप्रिय दावेदार म्हणून लोकांना त्यांचे मत विचारण्यात आले.
२.उद्धव ठाकरे हे सर्वेक्षणात अव्वल असून त्यांना 28 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय उमेदवार मानले आहे.
३.न्यूज तकच्या अहवालानुसार, 20 टक्के लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे.
४.देवेंद्र फडणवीस यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
५. 8 टक्के लोकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मान्यता दिली आहे.
६. 3 टक्के लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे.
७.मात्र महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लोकप्रियता एकत्र केली, तरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला मिळालेल्या पसंतीपेक्षा जास्त आहे.