आरआरआर नंतर राम चरणचे फॅन्स आता चित्रपट गेम चेंजरची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचा टीझर या महिन्यात रिलीज होणार आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला हा चित्रपट रिलीज होईल.
निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये लॉन्च करण्याचे नियोजन केले आहे. टीझर सोहळा होल. या सोहळ्यात राम चरण स्वत: उपस्थित असेल आणि माध्यमांशी संवाद देखील साधणार आहे.
मेगा स्टार राम चरण आणि कियारा आडवाणी यांचा तेलुगु चित्रपट ‘गेम चेंजर’ पुढील वर्षीच्या सुरुवातीला मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. गेम चेंजर एक पॉलिटिकल ड्रामा आहे. गेम चेंजर एक पॅन इंडिया तेलुगु चित्रपट आहे. हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. प्रमोशन करण्यासाठी आता निर्मात्यांनी कंबर कसली आहे. टीझर आता याच महिन्यात ९ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल.
गेम चेंजरमध्ये ‘हे’ आहेत तगडे कलाकार
गेम चेंजरमध्ये राम चरण-कियारा शिवाय श्रीकांतस अंजली, एसजे सूर्या, नवीन चंद्रा, समुतिरकनी कलाकार दिसताल. या चित्रपटाचे दिग्दर्शन २.० आणि इंडियन यासारखे चित्रपट आणणारे शंकर यांनी केले आहे. चित्रपटाला तामम यांनी संगीत दिलं आहे. दिल राजू यांनी श्री व्यंकटेश्वर क्रिएशन्स बॅनर अंतर्गत निर्मिती केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारीत तेलुगु, तमिळ आणि हिंदीमध्ये रिलीज होईल.
