
क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
टीम साऊदीने (Tim Southee) न्यूझीलंडसाठी 2008 मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले असून 382 विकेट्स घेतल्या आहेत. साऊदीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंत कर्णधारपदाची जबाबदार टॉम लेथमकडे देण्यात आली होती. आता तर साऊदीने कसोटी क्रिकेटमधूनच निवृत्ती जाहीर केली आहे.
टीम साऊदी इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याआधी भारतात तीन कसोटी सामन्यांची मालिका झाली. या मालिकेत टीम साऊदी संघात होता. या मालिकेत न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा तीनही सामन्यात पराभव केला. तर या मालिकेच्या आधी घरच्या मैदानावर श्रीलंका संघाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.
यावेळी टीम साऊदी संघाचा कर्णधार होता. या पराभवानंतर मात्र त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. कर्णधार नसताना झालेल्या भारता विरुद्धच्या मालिकेत टीम साऊदीने चांगली कामगिरी केली होती..