
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घचस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहेत. याविषयी नवनवीन माहिती समोर येत असते. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंबियांनी मौन साधलं आहे.
अशातच ऐश्वर्याने नुकताच आराध्याचा वाढदिवस साजरा केला. मात्र या वाढदिवसालाही बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच उपस्थित नव्हतं. यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना खूप ट्रोल केलं आणि घटस्फोटाच्या चर्चांणा आणखी हवा मिळाली. या सर्व चर्चांदरम्यान अमिताभ बच्चन यांची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये शेअर केले, ‘वाढदिवस होतात… वाढदिवस शुभेच्छांसाठी साजरे केले जातात… पण आज जरी कोणी उल्लेख केला नसला तरी ते सर्व आपल्या हृदयात आणि मनात राहतात.’ ही ओळ चाहत्यांच्या लक्षात येताच त्यांनी ती आराध्याशी जोडली.
अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये पुढे सांगितलं, ‘काम सुरूच आहे आणि आवश्यक आदराने ते नेहमीच केलं जातं… आणि कदाचित असं होऊ शकते की प्रेक्षकांशिवाय काम करणं हे अपुरं आहे. ते येतात, ते जल्लोष करतात आणि आम्ही प्रेरित होतो आणि मग तो त्यांना आणखी प्रेरित करतो. ते आम्हाला ते प्रेम देतात आणि ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येक केबीसी सीझनमध्ये हे करतात..’ शेवटी त्यांनी लिहिले- ‘नेहमीप्रमाणेच माझे प्रेम आणि कृतज्ञता.’
या सगळ्यामध्ये ऐश्वर्या रायची लेक आराध्याच्या 13व्या वाढदिवसाच्या पार्टीतील छायाचित्रांसह पोस्ट व्हायरल झाली आहे. फोटोंमध्ये असं दिसून येतं की ऐश्वर्याने आराध्यासाठी डिस्को-थीम असलेली वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती कारण तिची लाडकी आता आता किशोरवयीन आहे. ऐशची ही पोस्ट पाहिल्यानंतर घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा वेग आलाय.