
नाते निर्माण व्हावे, टिकून राहावे आणि वाढावे म्हणून आपण प्रयत्नशील असतो.मानवी जीवनात मौलिक स्थान असणाऱ्या नात्यांचे बंध तुटताना किती मन:स्ताप होतो, दु:ख होते, हताश वाटते हे आपल्यापैकी प्रत्येकालाच पुरेपूर माहीत आहे.
काही कारणांमुळे नात्यामध्ये वितुष्ट आले तरी रक्ताची नाती नेहमीच जपली जातात. महाराष्ट्रातील सर्वात शक्तीशाली पवार कुटुंबात आजही सर्वांमध्ये आपुलकी आणि प्रेम पाहायला मिळते. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात या कुटुंबाची एकता पाहायला मिळते. मात्र राजकारणामुळे पवार कुटुंबात कटुता निर्माण झाली. काकांच्या अंगा-खांद्यावर खेळलेला सख्खा पुतण्याच विरोधक म्हणून उभा राहतो. बारामतीत सख्खा काका वि. सख्खा पुतण्या अशी लढत झाली. या लढतीत काकांनीच बाजी मारली. मात्र पुतण्याच्या पराभवानंतर दिलेली प्रतिक्रिया ही पुतण्याचा पराभव झाल्याचा खंत व्यक्त करणारी होती.
अजित पवार यांनी बारामती जिंकल्याने थेट शरद पवार यांच्याविरोधातील लढाई त्यांनी जिंकल्याचे आता बोलले जात आहे. युगेंद्रच्या पराभवानंतर बोलताना अजित पवार गहिवरल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार म्हणाले, युगेंद्रला माझ्या विरोधात उमेदवारी नको द्यायला हवी होती. प्रतिभाकाकी माझ्या आईसारख्या आहेत . मला वाईट वाटत होतं की त्या भिंगरी लागल्या सारख्या फिरत होत्या. युगेंद्रेने ताईचे काम केले म्हणून लगेच त्याला उमेदवारी दिली. त्याला शिकू द्यायला हवे होते. काम करू द्यायला हवे होते.
युगेंद्रच्या पराभवावर अजित पवार काय म्हणाले?
तेच दुसरीकडे शरद पवारांनी देखील आज माध्यमांसमोर येत आज पहिल्यांदाच युगेंद्रच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, , युगेंद्र लवकर राजकारणात आला. युगेंद्र पवारांना उतरवणं चुकीचे नव्हते. अजित पवार यांचे काम होते. असं आहे की, कोणता ना कोणता उमेदवार पराभूत करत असतो. त्या मतदारसंघात डायरेक्ट माझा संबंध आहे. उलट तिथे उमेदवार उभा केला नसता तर वेगळा मेसेज गेला होता. आम्हाला माहिती होतं दोघांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवार यांचं सत्तेतलं स्थान हे एका बाजूला एक नवखा तरुण एका बाजूला आम्हाला त्याची कल्पना नव्हती.
प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवार यांचा विजय
अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यामुळे अजित पवारांना मोठा फटका बसला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी बारामतीत नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. शरद पवारांनी आपली पूर्ण ताकद युगेंद्र पवार यांच्या बाजूने लावली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील बारामतीत प्रचारासाठी ठाण मांडलं होतं. अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवार यांचा विजय झाला आहे.