
जी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे (Sangamner Assembly Constituency) सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले.
संगमनेर : राज्यातील संयमी नेते आणि काँग्रेसशी कायम एकनिष्ठ असलेले दिग्गज नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला.
यातून त्यांचे समर्थक अजूनही सावरत नाहीये. निकालाच्या दिवसापासून निर्भेळ प्रेमापोटी राज्यभरातील कार्यकर्त्यांची संगमनेरातील सुदर्शन निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी रीघ लागली आहे. हा पराभव अशक्यच आहे, असे म्हणताना अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू निघत असल्याचे पाहायला मिळते. यावरून थोरात यांचा राज्यभर असलेला दांडगा जनसंपर्क आणि जुळलेली नाळची प्रचिती दिसून येते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे (Sangamner Assembly Constituency) सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांना सरकारमध्ये काम करण्याचीही संधी मिळाली. आमदार झाल्यानंतर त्यांना पाटबंधारे राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर सत्ता मिळत गेल्याने त्यांनाही वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी निभवायला मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष अडचणीत असताना प्रदेशाध्यक्षपदाची खांद्यावर घेऊन नवसंजीवनी दिली.
लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोट एकसंध ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत त्यांनी राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळवून दिले. त्यांचा काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी त्यांनी राज्य पिंजून काढले होते. आत्ता देखील विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
जागा वाटपात त्यांनी अत्यंत संयमाने निर्णय घेतले महाविकास आघाडीला कुठेही धक्का लागणार नाही याची खबरदारी घेतली. उमेदवार घोषित झाल्यानंतर राज्यभर महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली. या काळात स्वतःच्या मतदारसंघालाही त्यांनी पुरेसा वेळ मिळाला नाही. येथील संपूर्ण जबाबदारी त्यांनी कार्यकर्त्यांवर सोपवली होती. त्या बळावरच त्यांनी राज्यभर दौरे केले.
पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी जंग- जंग पछाडली. परंतु, या धामधुमीत त्यांना मनोमन वाटत असतानाही मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देता आला नाही. हा आपला हक्काचा मतदारसंघ असल्याच्या भरवशावर त्यांनी मोठी रिस्क घेतली होती. अखेर निकालानंतर त्यांचा अनपेक्षित पराभव झाल्याने कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तत्काळ सुदर्शन निवासस्थानी मोठी गर्दी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. हा सिलसिला अजूनही सुरूच असून, अहिल्यानगर सह राज्यभरातील असंख्य समर्थक, चाहते संगमनेरत येऊन बाळासाहेब थोरात यांची भेट घेत आहे. ते त्यांना दिलासा देत पुन्हा एकदा लढू आणि जिंकू असा विश्वास देत आहे. यावरून त्यांच्या संयमाची आणि जिद्दीची चुणूक दिसून येते.
बाळासाहेब थोरात यांचे आम्ही पहिल्यापासून एकनिष्ठ म्हणून राहिलो आहे. त्यांनी गावासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिल्याने अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत. मात्र, तरीही त्यांना आमच्या गावातून मतदान झाले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोरातांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे. म्हणून मी माझ्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.