
‘ओबीसी नेते लक्ष्मण हाकेमध्ये एवढी हिंमत आहे तर त्यांनी पोलीस संरक्षण बाजूला ठेवून आष्टीत या म्हणावं आमच्या पद्धतीने चांगला सत्कार करू’ असं म्हणत भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव अभिजीत शेंडगे यांनी लक्ष्मण हाके यांना आव्हान दिलं आहे.
तसंच, हाकेंच्या वेगवेगळे प्रकार आमच्याकडेही आलेला आहेत, कुठून काय घेतले? किती घेतले? कसं घेतलं? हे आम्हाला माहित आहे येणाऱ्या काळात हे आम्ही ओपन करू, असा इशाराही अभिजीत शेंडगे यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ओबीसी आरक्षणासाठी लढा देणार लक्ष्मण हाके यांनी मंत्रिपदाबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव अभिजीत शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन हाकेंवर जोरदार हल्ला चढवला.
‘ओबीसी आंदोलनाला पुढे स्वतःच्या राजकीय स्वार्थ विधानपरिषद , कॅबिनेट मंत्रिपद मागत आहेत. सर्व धनगर आणि ओबीसी समाजातील जनतेला विनंती आहे लक्ष्मण हाकेंच्या नादी लागून आपापसात भांडण करू नका. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचा मुख्य रोल हा लक्ष्मण हाकेंचा आहे. आज आमचा धनगर वाडी वस्तीवर राहतो. त्याला प्रत्येक गावगाड्यात जायचंय प्रत्येक जागेवर मेंढर घेऊन जायचे आहेत. जिथे तिथे वेगळा समाजाच्या कुरनामध्ये मेंढर चारायचे आहेत त्यांना अडचणी येत आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या स्टेटमेंट आहे का? सामाजिक संतुलन लक्ष्मण हाके यांच्यामुळे बिघडलं आहे, असं म्हणत अभिजीत शेंडगेंनी हाकेंना चांगलंच फैलावर घेतलं.
हाकेंच्या वेगवेगळ्या प्रकार आमच्याकडेही आलेला आहेत, कुठून काय घेतले? किती घेतले? कसा घेतले? हे आम्हाला माहित आहे येणाऱ्या काळात हे आम्ही ओपन करू. हाके साहेब तुम्ही पण धनगराचे आहात मी पण धनगराचा आहे. माझ्या पण धमन्यामध्ये अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकरांचे रक्त आहे. सर्व पोलीस प्रशासन बाजूला ठेवून कुठला तारखेला येता ते सांगा आम्ही पण आम्ही पण तुमचा स्वागत आमच्या पद्धतीने करण्याचा स्वागत करू. आम्हाला काय हिम्मत नाही लायकी नाही, असं बोलू नका कोणाची लायकी काय आहे हे आजवर पडलेल्या मतावरून लक्षात येते तुम्ही जे विधानसभा आणि कॅबिनेट मागितलं त्याच्यावरून तुमची लायकी सिद्ध होते. धनगर समाजाची फसवणूक करू नका, असा इशाराही शेंडगेंनी दिला.
ओबीसी आंदोलनाच्या या लढ्यात ते सहभागी आहेत त्यांचा दृष्टिकोन तुम्हाला दिसतो का? या अगोदर त्यांनी एक दोन वेळेस विधानसभा आणि एक वेळेस खासदारकी लढवली. पण बोटावर मोजण्याएवढी मतं मिळाली. त्यांची जी दडून राहिलेली महत्त्वकांक्षा आहे ती. ओबीसी आंदोलनाला पुढे करून समोर आली. लक्ष्मण हाके हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करत आहेत. सर्व धनगर आणि ओबीसी समाजातील जनतेला विनंती करत आहे लक्ष्मण हाकेच्या नादी लागून आपापसात भांडण करू नका. आपलं जे सामाजिक संतुलन बिघडवण्याचा काम सुरू आहे ते केवळ आणि केवळ लक्ष्मण हाके यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहे हे धनगरांच्या लक्षात आलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.