राज्यघटना आणि लोकशाहीची सुरु असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव (Baba Adhav) यांनी पुण्यात 3 दिवस आत्मक्लेश उपोषण सुरु केले आहे.बाबा आढावांच्या या उपोषण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट दिली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर सडकून टीका केली. विधानसभेची मुदत 26 तारखेला संपलेली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, एवढं राक्षसी बहुमत मिळालं तरी आनंद झालेला नाही. विधानसभेची मुदत 26 तारखेला संपलेली आहे. या ठिकाणी जर आम्ही असतो तर एवढ्यात राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असते. नियम कायदे हे फक्त विरोधी पक्षासाठी बहुमत प्राप्त झालेल्या या महायुतीला कोणतेही नियम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करा.
महायुतीवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका
जिंकलेले ही इथे येत आहेत आणि हरलेले ही इथे येत आहेत याचा अर्थ त्यांचा ही विश्वास निकालावर नाही . वणवा पेटवायला ठिणगी लागते ती आंदोलनाच्या माध्यमातून पडली आहे. पैशाचा अमाप वापर झाला ते तावडेंच्या व्हिडीओत पाहतोय. जिंकलेले हरल्यासारखे येत आहेत आणि हरलेले जिंकल्यासारखे इथे येत आहेत याच कारण ईव्हीएम आहे.
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
माझं मत कसं रजिस्टर होतं कुणाला गेलं हे आरटीआयच्या माध्यामातून कळायला हवं. शेवटच्या तासात 76 लाख महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघातल्या बुथवर हजार लोकांची रांग असायला हवी होती. एवढं राक्षसी बहुमत मिळाल तरी आनंदोत्सव दिसत नाही .काही राजभवनावर जाण्याआधी शेतात जातात. अमावस्येला मुहूर्त का शोधतात? दावा करायला का जात नाहीत,असे म्हणत एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
