
आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा नाव न घेता आमदार रोहित पवार यांना लक्ष केलंय. तुतारी गटात किती आमदार आणि किती खासदार शिल्लक राहतात याकडे लक्ष द्या असा सल्ला देत मिटकरींनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
बालिश आमदार यांनी लोकशाही वाचविण्याच्या गप्पा गप्पा त्यांनी बंद कराव्या असा टोलाही त्यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. सध्या आमदार अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांच्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. यावरच आता दोघांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
अमोल मिटकरी म्हणाले, कर्जत जामखेडमधील एका बालीश नेत्याने लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही हे सर्व करत असून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे, असे ट्वीट केले. त्याला आमचं सांगणे आहे तुझ्या तुतारीकरता किती आमदार – खासदार राहतात याकडे लक्ष द्या. बाकी ठिकाणी लक्ष देण्याची गरज नाही. काल किती खासदार देवगिरीवर येऊन गेले आणि किती आमदार येणार आहे यावर त्यांनी चिंतन करावे.लोकशाही वाचवण्याच्या गप्पा त्यांनी नंतर कराव्यात.
चंगु मंगूला उत्तर देणार नाही : रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोद पदी रोहित पाटील आणि प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर रोहित पवार यांना डावलून जयंत पाटील यांनी बाल मित्र मंडळाच्या नेत्याचा करेक्ट कार्यक्रम केला, “अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. त्याबाबत बोलताना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले म्हणाले, त्या पक्षामधून माझ्यावर जर अजित पवार यांनी टीका केली, तर मी त्याला उत्तर देईल. मात्र त्यांच्या आसपासचे जे चंगु-मंगू आहेत. जे टीव्हीवर येण्यासाठी प्रतिक्रिया देतात त्यांच्यावर बोलणार नाही.