
परभणी जिल्ह्यात संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत झालेला मृत्यू व बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून या घटनांच्या निषेधार्थ कोऱ्हाळे बुद्रुक (ता.बारामती) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. संविधान प्रतिष्ठान, बौद्ध युवक संघटना, व्यापारी संघटना व संविधानप्रेमी यांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. यावेळी सरपंच रवींद्र खोमणे, माजी उपसरपंच अंकुश चव्हाण, किरण शिरवाळे, सुनील खोमणे, भाग्यवान चव्हाण, अनिल धायगुडे, गौरव अडागळे यांनी निवेदन दिले. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी निवेदन स्वीकारले..!