
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विकेटकिपर ऋषभ पंत पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. भारताला धावांची मोठी गरज असताना ऑस्ट्रेलियाला फुकटात विकेट देऊन तो माघारी परतला आहे.
त्यामुळे त्याच्या या खेळीवर आता संताप व्यक्य होतोय. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनीव गावस्कर यांनी त्याला थेट मुर्ख क्रिकेटवर म्हटलं आहे.
खरं तर चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाची अवस्था फारच बिकट झाली आहे. काल दुसऱ्या डावाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या ही 5 विकेट गमावून 164 इतकी होती. त्यामुळे टीम इंडियावर फॉलोऑनचा धोका होता. अशा अवस्थेत फॉलोऑनचा धोका टाळण्यासाठी जबाबदारी खेळणे अपेक्षित होते. मात्र ऋषभ पंतने त्याच्या अपयशाची मालिका कायम ठेवली आहे. ऋषभ पंत 37 चेंडूत 28 धावा करून आऊट झाला आहे.विशेष म्हणजे ऋषभ पंत ऑस्ट्रेलियाला फुकटात विकेट देऊन आऊट झाला आहे. त्यामुळे त्याच्या खेळीवर फॅन्सने नाराजी व्यक्त केली आहे.
ऋषभ पंत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात तो स्कॉट बोलंडच्या चेंडूवर बाद झाला. चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात पंत पॅव्हेलियनमध्ये परतला. पंतने लेग साइडच्या दिशेने शॉट खेळला आणि चेंडू थर्ड मॅनकडे गेला. नॅथन लियॉनने कोणतीही चूक न करता सोपा झेल घेतला. या खेळीत ऋषभ पंतने 37 चेंडूत 28 धावा केल्या आहे. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले.
टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर या खेळीवर प्रचंड भडकला आहे. त्यांनी ऋषभ पंतला मूर्ख म्हटलं आहे. तसेच त्याने भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये नव्हे तर इतर ड्रेसिंग रूममध्ये गेले पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांनी या मूर्ख क्रिकेटरला इंटेंट मर्चंट, मॅच विनर म्हणून प्रोजेक्ट केले आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतचा लज्जास्पद फॉर्म कायम आहे. मेलबर्नमधील चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याला अर्धशतक झळकावता आले नाही. स्वस्तात बाद होऊन तो पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या. बेजबाबदार शॉट खेळून तो बाद झाला. यानंतर लोक त्यांच्यावर खूप टीका करत आहेत. त्याने कांगारू संघाला आपली विकेट फुकटात दिल्याचेही बोलले जात आहे.