
ताफ्यात गाडी मुद्दाम टाकली; बजरंगबाप्पांचा मोठा दावा
वाल्मिक कराड प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी एक नवा दावा केला आहे. पोलिसांसमोर सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड ज्या गाडीतून पोहोचला, तीच गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती.
अजित पवार यांना अडकवण्यासाठी वाल्मिक कराडचा प्लॅन असल्याचा मोठा दावा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. तसेच अजित पवारांवर माझे कोणतेही आरोप नाहीत, असेही बजरंग सोनावणे म्हणाले.
बजरंग सोनावणे म्हणाले, वाल्मिक कराड ज्या गाडीने सरेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथे होता. मी विनाकरण आरोप करत नाही. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. ज्याच्या नावावर गाडी आहे तो तिथे होता. अजित पवारांना अडकवण्याच कराडचा प्लॅन असावा. आरोपी तिथे लोकांवर पाळत ठेवण्यासाठी होता. त्यांचा अजित पवारांना अडचणीत आणण्याचा यांचा प्लान होता. माझा अजित पवारांवर आरोप नाही. माझा आरोपीला सहकार्य करणाऱ्या माणसांवर आरोप आहे. मी विनाकरण कुणावर आरोप करत नाही मी प्रसिद्धीसाठी बोलत नाही.
गाडीचा मालक आमच्यावर पाळत ठेवून होता : बजरंग सोनावणे
बजरंग सोनावणे म्हणाले, गाडीचा मालक असणारा व्यक्ती अजित पवार मस्साजोगला आले त्यादिवशी तिथे होता. मी जेव्हा मस्साजोगला गेलो त्यावेळी देखील तिथे होता. हा व्यक्ती आमच्यावर पाळत ठेवण्यासाठी होता का? हा माणूस ज्यावेळी आरोपीला घेऊन आला.
गाडी कोणाच्या नावे एकदा तपासून बघा : बजरंग सोनावणे
वाल्मिक कराडच्या ताफ्यात अजित पवारांची गाडी होती,यावर बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले, ज्या माणसाच्या नावावर गाडी आहे तो माणूस तिथे होता. अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी आरोपिसाठी गाडीचा मालक काम करत होता का? गाडी कोणाच्या नावे आहे हे एकदा सर्च करून बघा सगळी उत्तर मिळतील. संतोष देशमुख यांच्या मारेकरी यांना फाशी द्या एवढीच माझी मागणी आहे. आणखी 3 आरोपी पकडले नाहीत त्यांना लवकर अटक केली पाहिजे.