
भाजपच्या बड्या नेत्यानं अखेर सांगूनच टाकलं…!
मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्येवरून (Santosh Deshmukh Murder Case) राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. अशातच आणखी एक मुद्दा चांगलाच गाजतोय तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पालकमंत्रीपद.
अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्याकडे आता बीडचं पालकमंत्रीपद राहणार नाही, असं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केली आहे. त्याशिवाय प्रकाश सोळंके, सुरेश धस यांनीसुद्धा अजित पवारांची मागणी केलीय. त्यामुळे आता बीडचे पालकमंत्री अजित पवार होतील असे बोलले जात आहे.
यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “पूर्वीपासून बीडचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आताही त्यांनी त्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच पालकमंत्री पद जाईल. पालकमंत्री कोण होणार, याबाबत राष्ट्रवादी काँगेस हा पक्ष निर्णय घेईल.”