
महाराष्ट्रात सध्या बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला केज कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आता वाल्मिक कराडने पोलीस कोठडीत मदतनीस मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे.तर दुसरीकडे चाकणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका सोहळ्यात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर उपस्थितीत राहणार आहेत. छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच व्यासपीठवरुन काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील अन्य महत्त्वाच्या बातम्यांसाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा