
PM मोदींचा हल्लाबोल, केजरीवालांकडूनही जोरदार प्रत्युत्तर..
दील्ली विधानसभा निवडणुकीआधीच दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना ४५०० कोटी रुपयांचं गिफ्ट दिलं आहे. १६७५ गरीबांना फ्लॅट, दिल्ली विद्यापीठाला दोन नवीन कॅम्पस, सावरकर कॉलेजसहित अनेक घोषणा केल्या आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी स्वत:साठी मोठं शीशमहल तयार केलं असतं, पण गरीबांना पक्के घरे द्यायचे आहेत, असं बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींच्या टीकेला अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक विहार येथील रामलीला मैदानातील कार्यक्रमात विकासकामांची घोषणा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांचं नाव न घेता टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देश जानतो की, मोदींनी स्वत:साठी घर तयार केलं नाही. मागील १० वर्षात ४ कोटींहून अधिक गरिबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं. मी देखील एखादा शीशमहल तयार केला असता. परंतु माझ्यासाठी देशवासीयांना पक्के घरे मिळणे महत्वाचे आहे. हेच एक स्वप्न आहे’.
पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं की, ‘मी आश्वासन देतो की, ‘दिल्लीतील झोपडपट्टीवासीयांना पक्के घरे देऊ. मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही लोकांमध्ये जावा. लोकांच्या भेटी घ्या. आताही अनेक लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. त्यांना आश्वासन देतो की, आज ना उद्या त्यांच्यासाठी पक्के घरे नक्कीच मिळतील’.
पंतप्रधान मोदींनी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली. ‘अन्ना हजारे यांना पुढे करून काही विश्वासघातकी लोकांनी ढकलून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आप सरकारवर घोटाळ्याचा आरोप केला. दिल्लीतील मतदारांनी दिल्लीतील संकटातून मुक्त होण्याचा निश्चय केला आहे. दिल्लीतील प्रत्येक गल्लीतील आप सरकारविरोधात आवाज येत आहे’.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘२७०० कोटींच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून शीशमहलविषयी वक्तव्य शोभत नाही, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं.