
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांसह सत्ताधाऱ्यातील काही नेते आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं दिसत आहे. काल 6 जानेवारी रोजी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली.
या प्रकरणात देशमुख यांची हत्या करीत असतानाचा व्हिडिओ एसआयटीला मिळाला असून यात आरोपी हत्येचा पाशवी आनंद घेत असल्याचं दिसत आहे. यानंतर ते राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे मुंबईकरांना हुडहुडी भरल्याचं दिसून येत आहे. उत्तरेकडील येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात थंडी वाढली आहे.