
हवेत फायरिंग करणाऱ्या कैलास फडसोबत लक्ष्मण हाकेंचे फोटो, दमानियांचा ‘अल्बम बॉम्ब’
मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या आणि हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंततर 24 तासात जामीन मिळवणारा कैलास फड पुन्हा चर्चेत आला आहे. कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता याच कैलास फडसोबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचे फोटो शेअर केले आहेत.
ट्वीटरवरुन अंजनी दमानिया यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
अंजली दमानिया यांनी दुपारी लक्ष्मण हाकेंचे आणि वाल्मिक करड सोबत जेवण करतानाचे फोटो शेअर केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती, त्याचा दमानियांनी फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिले आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, आणि एक फोटो आला …. या वेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थक कैलाश फड यांच्या बरोबरचा हा फोटो. हेच कैलास फॅड व त्यांचे सुपुत्र हे 2024 च्या निवडणुकीत बूथ वर हैदोस घालत होते…
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून आहेत. भाजप आमदार सुरेश धसांविरोधात लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत. वाल्मिक कराडला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. तसेच वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याची बाब हाके यांनी अधोरेखित केली. वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत, असे लक्ष्मण हाके म्हणाले. त्यानंतर काही वेळातच अंजली दमानिया यांनी एकापाठोपाठ फोटो ट्वीट केले आहेत.
सरपंच हत्या प्रकरणात मोठमोठी नावंही चर्चेत
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा गेल्या चार आठवड्यांपासून तपास चालू आहे. यासंदर्भात रोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत असून त्यात अनेक मोठमोठी नावंही चर्चेत आली आहेत. त्यात चर्चेतली दोन प्रमुख नावं म्हणजे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा प्रमुख सहभाग होता असा दावा केला जात असून त्यासंदर्भात पोलीस सखोल तपास करत आहेत.