
सुरेश धसांची दांडी-जरांगेंचं मौनव्रत, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार सुरेश धस चर्चेत पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण धस यांनी लावून धरलं आहे. विधानसभेमध्ये यावरून आवाज उठवला आणि धनंजय मुंडेंवरही आरोप केले. वाल्मिक कराडला आका म्हणत धस यांनी आरोप केले.
सातत्याने आरोपांचा धुरळा उडवला आहे. गुरुवारी देखील पैठण येथीस मोर्चात त्यांनी अनेक खुलासे केले. आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे महाजनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेला धस अनुपस्थित होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे उपस्थित होते पण त्यांनीही भाषण केले नाही.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी हे मोर्चे निघत आहे. प्रत्येक सभेत सुरेश धस यांनी आक्रमकपणे भाषण केले, पण आज जालन्याच्या सभेतील सुरेश धसांची अनुपस्थिती सर्वांना खटकत होती. त्यानंतर स्वत: आमदार सुरेश धसांनी मोर्चाला उपस्थित न राहण्याचे कारण सांगितले आहे. तर तब्येत ठीक नसल्याने मनोज जरांगेंनी भाषण केले नाही
काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस म्हणाले, तब्येत खराब असल्याने जालन्यातील मोर्चाला गौरहजर होतो. शिवाय आज पंचायत समितीमध्ये जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची बैठक होती, त्यामुळे जालन्यातील आक्रोश मोर्चाला जाता आले नाही
माझ्या वडिलांना छळ करून का मारलं? सरपंचाच्या लेकीचा सवाल
जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे महाजनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी धाय मोकलून रडली. भर सभेत वैभवीने वडिलांची माफी मागितल्याने उपस्थितांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. आम्ही ज्यावेळा रस्त्याने जाताना आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून सर्वजण आमची काळजी घेत होते. आज जसे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात तसेच कायम उभे राहा.
आज आम्हाला फक्त चालताना धक्काबुक्की झाली तेव्हा आम्हाला कळालं की गर्दीतून चालताना किती त्रास होतो. माझा फक्त आरोपींना एकच सवाल आहे की, माझ्या वडिलांचा इतका छळ करून का मारलं? माझ्या वडिलांचा छळ करुन मारले त्यांना किती वेदना झाल्या असतील. त्यांना का एवढा त्रास का दिला? असा सवाल देखील वैभवीने आरोपींना विचारला आहे.