
धनंजय पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले.!
भावाला न्याय मिळावा, यासाठी सुमारे दोन तासापासून पाण्याच्या टाकीवर चढलले संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरागे, पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत आणि मस्साजोगचे ग्रामस्थांनी धनंजय यांची समजूत काढली.
जरांगे पाटलांनी टाकीवरुन खाली उतरण्यासाठी धनंजय यांनी सहा फोन केले होते, कॉवत यांनीही त्यांना सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धनंजय हे टाकीवरुन खाली उतरले.
आपला भाऊ मयत संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत सीआयडी आणि एसआयटी जो तपास करीत आहेत, त्याची माहिती आम्हाला मिळत नाही, ती माहिती आम्हाला मिळाली, वाल्मिक कराडला मोक्का लावा, फरार कृष्णा आंधळे याच्या मुसक्या आवळा, अशी मागणी धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
हे आरोपी सुटले तर उद्या माझाही खून करतील, मग कुटुंबासाठी न्याय मागणारा कोणीही राहणार नाही.त्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढून मी स्वतःला संपवतो, असा इशारा धनंजय देशमुख यांनी रविवारी दिला होता.
आज (सोमवारी) त्यांनी आरोपी मोकाट सुटले तर ते आमच्यासारख्याचे मुडदे पाडतील, असे सांगत सकाळी अकरा वाजता पोलिसांना गुंगारा देत पाण्याच्या टाकीवर सोडून आंदोलनास सुरवात केली.
मनोज जरांगे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत ‘मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर कुटुंबाने विश्वास ठेवला. त्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे. ही वेळ त्यांच्यावर येणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना हलक्यात घेऊ नये, ‘ असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
कुटुंबाला काय झालं, आरोपी सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी नीट राहणार नाही. मी माझ्या जातीला रिझल्ट देतो, मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. मी एकदा बोललो. धनंजय मुंडेच्या टोळीच जगणं मुश्किल करेन” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
या आंदोलना दरम्यान टाकीखाली जमा झालेल्या महिलांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबत पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत पोलिस अधिकाऱ्यांना बांगड्या दाखवल्या.
धनंजय आंदोलन करीत असलेल्या टाकीच्या जवळ असलेल्या टाकीवरुन पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत आणि जरांगे यांनी फोन करुन धनंजय आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.