
समोर आली महत्त्वाची माहिती
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Aandhale) याला पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आले नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
अशातच आता कृष्णा आंधळेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसरली आहे. विशेष म्हणजे तो नाशिकमध्ये फिरत आहे, असा दावा करणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे पोलिस यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे.
दरम्यान याबाबत पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी केली. उपनगर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन करून कृष्णा आंधळे याची माहिती घेतली असता सोशल मीडियावरील व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ कृष्णा आंधळेचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Krishna Aandhale in Nashik City?
काल कोर्टाने वाल्मिक कराड (Walmik Karad) ला 22 जानेवारीपर्यंत म्हणजे आणखी 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे कराडला मोठा धक्का बसला आहे. वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात काय बोलणं झाला याचा तपास करण्यासाठी कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.