दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / दि.१२ जानेवारी २०२५ रोज रविवारी, बीड येथे सकाळी १० ते ५ या दरम्यान वीरशैव लिंगायत वधू – वर सूचक मंडळ महाराष्ट्र राज्य व कपिलधार मासिक पौर्णिमा पद यात्रा मंडळ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर सूचक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्याचे उदघाटन श्री ष.ब्र. १०८ श्रीगुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांच्या हस्ते झाले तर कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी श्री ष.ब्र.१०८ श्रीगुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज हे होते. या मेळाव्यास जवळपास तीनशे उप वधू – वर यांची नोंदणी झाली असून मोठया संख्येने पालक वर्गही उपस्थित होता.
वीरशैव लिंगायत वधू – वर सूचक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री शिवसांब कोरे यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपस्थित उप वधू-वर व पालक जनसमुदायला आव्हान केले की वधूवर परिचय मेळाव्याचा उद्देश हा नवं वधू-वरांना आपल्या आयुष्याचा अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी मदत व्हावी हा आहे, वधूवर परिचय मेळाव्यात आपली मुलं-मुली यांची पसंती महत्वाची असल्यामुळे परिचय मेळाव्यास जर आपले मुलं-मुली येणार असतील तरच नोंदणी करावी अन्यथा फक्त पालकांनी येऊ नये या मूळ मुलं-मुली कमी व पालकच जास्त होऊन मेळाव्याचा उद्देश बाजूला जात आहे.असे सांगितले.
कार्यकर्माचे उदघाट्न पर मार्गदर्शन करताना श्री ष.ब्र.१०८ श्रीगुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांनी भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कारातील सर्वात पवित्र हा विवाह संस्कार असून मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींसाठी फक्त श्रीमंत मुलगा एवढाच विचार न करता चारित्र्य सम्पन्न निर्व्यसनी कर्तृत्व वाण मुलगा पहावा असे सांगताना शिव आराध्य बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठाण व कपिलधार मासिक पौर्णिमा मंडळ यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री.ष.ब्र.१०८ श्रीगुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी असे म्हणाले की, आजच्या सोशल इंजिनिअरिंगच्या व्यस्ततेच्या काळात पालकांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी व आपल्या पाल्याला अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी वीरशैव लिंगायत वधूवर सूचक मेळावे अत्यावशक आहेत.
प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला जवळचे स्थळ मिळावे असे वाटते, पालकांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी वीरशैव लिंगायत वधूवर सूचक मंडळ महाराष्ट्र राज्य कपिलधार मासिक पौर्णिमा पदयात्रा मंडळ बीड यांनी आपल्या बीड जिल्ह्यात आपला समाज विखूरलेला असताना पहिल्यांदा हा मेळावा घेतला आणि एवढा जबरदस्त प्रतिसाद, मेळाव्याचे अचूक नियोजन,मेळाव्याला नवं-वधूवराणा परिचयसाठी सकाळी ११ वा पासून डायरेक्ट स्टेज देत कुठल्याही प्रकारे राजकीय स्वरूप आणले नाही, परिचय मेळाव्यात पालका पेक्षा मुलं व मुलीची उपस्थिती जास्त राहवी म्हणून प्रोत्साहन पर दहा भाग्यवान उप वधू वर यांना दोन्ही महाराजांच्या हस्ते चांदीचा लिंगाकार व रुद्राक्षाची माळ भेट दिली,जास्तीची भाषण बाजी व सत्कारात वेळ न जाऊ देता मुलं-मुली यांना न्याय देण्याचे वधूवर सूचक मंडळाचे नियोजन पाहून खुप मन भरून आले असेच सामाजिक मिळावे होणे हिच काळाची गरज आहे यापुढेही असेच मेळावे घ्या माजलगावकर महाराज मठ मंगलकार्यालय तुम्हाला मेळाव्यासाठी मोफत देऊ असे सांगून समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन श्री संदीप शेटे व दिलीप आप्पा ढेपे, शिवशँकर स्वामी यांनी केले यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सतीश स्वामी यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंगायत वधूवर सूचक मंडळ महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रा.माधव लाईदवार, कोषअध्यक्ष पुष्पा करंजे,प्रा.संजय चौडे,अशोक चिपाडे, अंनत शहागडकर,गणगाधर शेटे, दिलीप ढेपे,संजय घाळे, विलास बेदरकर,विजयकुमार मुसळे,प्रा.सतीश स्वामी, शिवकुमार चिपाडे, अनिल मिटकरी,ओंकार रेवडकर, सतीश नगरे,शिवा भुरे,अशोक शहागडकर, श्रीकांत मिटकरी,मनमथ होनरावं, सुरेश चाकोते, अरविंद मिटकरी(पुणे), पंडित मांगणाळे,शिवाप्पा मिटकरी, शिवसांब जनकवाडे, रुद्राक्षे, त्रिफळे नंदू देवणे, ज्योती नखाते व सर्व सदस्य कपिलधार मासिक पौर्णिमा पदयात्रा मंडळ बीड यांनी मेहनत घेतली व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
