दैनिक चालू वार्ता
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी धनाजी साठे
पिंपरी:पी.एम.पी.एम.एल.राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन चे सरचिटणीस मा. सुनीलभाऊ नलावडे यांचा वाढदिवस व सेवापूर्ती निमित्त युनियनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक व कामगार नेते यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या समवेत पिं.चिं.मधील इतरही सहकारी सेवानिवृत्त होत आहेत अशा सेवकांचा सेवापुर्ती निम्मित्त सत्कार संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.श्री.विजयराव लोखंडे ( मा. सभापती शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड मनपा ) हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे, म्हणून पिं.चिं शहराचे मा.महापौर श्री.संजोगभाऊ वाघिरे पाटील, प्रा.सौ.कविताताई आल्हाट ( महिला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं.चिं.शहर) मा.श्री.किरणशेठ थेऊरकर ( अध्यक्ष:- पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियन) कामगार नेते,श्री.अरुणभाऊ बोराडे (मा. नगरसेवक पिं. चिं.मनपा) ,सामाजिक कार्यकर्ते,मा.श्री.विकासभाऊ जगधने, मा.श्री.विनोदभाऊ सस्ते पाटील, यांच्या सह जेष्ठ कामगार नेते श्री नरहरी कापसे,श्री.रविंद्र लांडगे , श्री.सोमनाथ (आप्पा) शिंदे,श्री.सुभाष गोसावी,श्री.विश्वनाथ (नाना) शिंदे, श्री.संजय कुटे,श्री.संदिपान साबळे, यांची उपस्थिती लाभली तसेच पीमपीएमपीएल मधील अधिकारी वर्गासह कर्मचारी बंधु -भगिणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.योगेश चौधरी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर श्री.दिपक गायकवाड कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.संतोष शिंदे, श्री.संदीप कोंढाळकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री .रमेश अर्धाले (स्वामी) यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच पिंपरी चिंचवड विभागातील तिन्ही डेपो तसेच हेडकॉटर 2 च्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
कामगार नेते सुनील भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग उपस्थित होता अनेक मान्यवरांनी भाऊंना आपल्या मनोगत शुभेच्छा व्यक्त केल्या.
