
पालकमंत्री पदावर ‘पंकजा मुंडें’ची मोठी प्रतिक्रिया
गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या पालकमंत्री पदाची यादी काल जाहीर करण्यात आली. अपेक्षप्रमाणे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वत: कडे ठेवली. यासह त्यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील देण्यात आलं.
तर मंत्री धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेले नाही. अशातच आता अजित दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“माझा बीड जिल्हा अत्यंत चांगला आहे. त्याचा आता अजितदादांना अनुभव येणार आहे. दुर्दैवी घटना हे कुणाच्या राजकारणाचं मंच असू शकत नाही. संवेदनशीलपणे हाताळण्याचा विषय आहे. एखादी घटना पाशवी पद्धतीने केलेली हत्या ही समाजावर लागलेला कलंक आहे. तो कलंक पुसण्यासाठी ते ते सर्व लोक प्रयत्नात राहिला पाहिजे. त्याबद्दल आमचं खरं दायित्व आहे. त्याबाबत आम्ही संवेदनशील बाळगलं आहे.” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याने मंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. तर बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. असेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.