सुरेश धस यांचे कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, ते १५० कॉल कुणाचे?
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराड यांचे मुले सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दीडशे कॉल केले, असा सनसनाटी आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.
सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या संदर्भाने निवेदन देण्यासाठी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक गुन्हे शाखेकडे महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास देण्याचे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मान्य केल्याचे धस यांनी सांगितले.
महादेव मुंडे यांची हत्या २२ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली. घटनेला वर्ष दीड वर्ष उलटूनही कुटुंबाला अजूनही न्याय मिळत नाही. पोलीस तपास करीत नाहीत, आरोपी मोकाट आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
वाल्मिकच्या पोरांनी तपासी अधिकाऱ्यांना १५० कॉल केले
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराड यांचे मुले सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दीडशे कॉल केले आहेत. त्यांचे फोन कॉल पडताळण्यात आलेले आहेत. या हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त आहेत. एक कर्मचारी पंधरा वर्षापासून परळीतच कार्यरत आहेत. लवकरच यासंदर्भात मी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन परळी पॅटर्न त्यांच्या उलगडगून सांगणार आहे, असे सुरेश धस म्हणाले.
परळीत पोलीस कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळे आकाने निवडले
परळीत पोलीस कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळे आकाने निवडले आहेत. त्यामुळे गुन्हे विभागाला हे प्रकरण देण्याची मागणी मी केली आहे. मुंडे यांच्या कुटुंबाने देखील हीच मागणी केली आहे. माझ्याकडे जी माहिती आली, त्या आधारावर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे यात येत आहेत. विष्णू फड, भास्कर केंद्रे यांचे कॉल डिटेल्स चेक करावे. जेणेकरून मारेकरी समोर येतील, असे सुरेश धस म्हणाले.
जशी मुन्नी बदनाम तसे बीडचे पोलीसही बदनाम झालेत
तसेच पीआय बल्लाळ आणि सुरेश धस यांच्या व्हायरल ऑडिओ कॉलवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धस म्हणाले, “जशी मुन्नी बदनाम तसे बीडचे पोलीसही बदनाम झाले आहेत. त्याला अटक झालेली असतानाही वाल्मिक कराड गाडीत बसत असताना रोहित कुठे असे तो विचारतो आणि मिस्टर बल्लाळ त्यांना आवाज देतात… अरे बापरे बीडच्या पोलीस दलात हे काय चाललंय..?
