ही कदाचित…
स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ मधील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली आहे. अॅलेक्झांडर झेव्हरेव्हविरुद्धच्या या लढतीत पहिला सेट एक तास २१ मिनिटांचा राहिला आणि त्यात जर्मनीच्या खेळाडूने पहिला सेट ७-६ ( ७-५) असा टायब्रेकरमध्ये जिंकला.
हा सेट संपल्यानंतर लगेचच जोकोविचने चेअर अंपायरशी हस्तांदोलन करत दुखापतीने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
याआधी कार्लोस अल्काराझविरुद्धच्या सामन्यात जोकोविचला त्याच्या डाव्या पायाच्या दुखापतीच्या समस्येचा सामना करावा लागला होता. त्याने सुरुवातीच्या सेटनंतर वैद्यकीय टाइमआउटही घेतला होता. तो त्याच्या पायावर टेप लावून परतला आणि त्याने अल्काराझला चार सेटमध्ये पराभूत केले.
गुरुवारी जोकोविचने प्रशिक्षण सत्र देखील रद्द केले होतो. झेव्हरेव्हविरुद्धच्या सामन्यात जोकोविच पुन्हा त्याच्या पायाला टेप लावून आला होता. यावेळी पहिल्या सेटमध्ये तो चांगाल खेळू शकला नाही आणि त्याला टाय ब्रेकरमध्ये हार मानावी लागली. त्यानंतर त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. झेव्हरेव्ह प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि त्याला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जॅनिक सिनर व अमेरिकेच्या बेन शेल्टन यांच्यातल्या विजेत्याशी होईल.
ही कदाचित माझी शेवटची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा असू शकेल. हे पर्व कसे जाते, त्याकडे माझे लक्ष असेल. मला खेळायचं आहे, परंतु दुखापतीवर सर्व अवलंबून आहे, असे नोव्हाक म्हणाला.
नोव्हाकने ११ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे आणि त्याच्या नावावर २५ ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत. जोकोविचसाठी अल्काराजविरुद्धचा विजय ऐतिहासिक ठरला होता, कारण त्याने या विजयासह तब्बल ५० व्यांदा ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तसेच १२ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. तो सर्व चार ग्रँडस्लॅम स्पर्धेत १२ किंवा त्यापेक्षा अधिकवेळा उपांत्य फेरी गाठणरा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
