
३२४३८ रिक्त जागा, पात्रता काय? कोणत्या पदासाठी किती पगार? जाणून घ्या सर्वकाही
रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सर्वांचीच इच्छा असते. रेल्वे नेहमीच नवनवीन भरती जाहीर करत असतात. रेल्वेने नुकतीच ग्रुप डी पदासाठी भरती जाहीर केली आहे. तब्बल ३२००० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
शिक्षण
रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.ग्रुप डी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे गरजेची आहे. तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणेदेखील गरजेचे आहे. या नोकरीसाठी १८ ते ३६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
या विभागात भरती
रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये इंजिनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सायन्स अँड टेक्नोलॉजी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक लोको शेड (डिझेल),सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल), सहाय्यक भरती,पॉइंट्समन B, ट्रॅक मेटेंरनर या पदासाठी आहे.ग्रुप डी पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कर्मचारी रेल्वे ट्रॅक, कोच, स्टोअर्सची देखभाग करावी लागते.
निवड..!
रेल्वेतील ग्रुप डी पदांसाठी उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणीदेखील केली जाणार आहे. कॉमप्युटर बेस्ड परीक्षा ही दीड तासाची असणार आहे.