
राम शिंदेंनी भर सभेत रोहित पवारांना डिवचलं
कर्जत जामखेड मतदारसंघावरील निवडणूक शेवटपर्यंत रंजक राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित राजेंद्र पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
पण अखेरच्या ईव्हीएममध्ये रोहित पवार यांची लीड वाढली आणि त्याना विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर राम शिंदेंना पुढची चार वर्षे विधानपरिषदेची आमदारकी असतानाही तुम्ही विधानसभेची निवडणूक का लढवली? असे लोक विचारत होती. पण ज्याने आपल्याला पाडले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती. गडी थोडक्यात हुकला, ते पण थोडा फार दगाफटका झाला म्हणून नाहीतर गाठलं होत, असे म्हणत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थितीत इंदापुरात सभापती राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
राम शिंदे म्हणाले. गडी थोडक्यात हुकला,ते पण थोडा फार दगाफटका झाला म्हणून नाहीतर गाठलं होत. आता 600 मतांनी पराभव झाला आहे. 2029 ला बघू पुन्हा एकदा दाखवू. 2029 ला पुन्हा कर्जत जामखेडची निवडणूक लढवणार आहे. हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते है! 288 आमदार पडले आहेत त्यात मी पण आहे. 19 डिसेंबरला कार्यकाळ संपायला एक दिवस कमी असताना मी या महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती झालो. 1243 मतांनी माझा पराभव झाला,. विधान परिषदेचा सभापती झाल्यानंतर बाहेर फिरता येत नाही ते कोर्टासारखा आहे.
विकास करता येत नाही राजकीय काही बोलता येत नाही, असा अनेकांचा समज होता. मी तर भाजपाचा नसतो तर सभापती झालो असता का ? त्यामुळे आपल्यावर आहे ते कसं चालवायचं. सभागृह चालू असून नसो कोणालाही फोन करता येतो त्यांना तातडीने दालनात बोलून घेता येते असं हे पद आहे.
आमदारांच्या पगारावर सह्या माझ्या आहेत : राम शिंदे
मी सभापती आहे. मी झोपल्यावर कधी कधी विचार करतो, आपलं बरं झालं का वाईट झालंय.जरी निवडून आलो असतो तरी 42 मंत्र्यामध्ये मिळाला असता का नाही तो वेगळाच भाग आहे. विधान परिषदेला 100 वर्ष झाले आहेत. माझ्या एवढ्या तरुण माणसाला पहिल्यांदा सभापती पद मिळाल आहे.कारण ते वरिष्ठ आणि ज्येष्ठांच सभागृह आहे. पण कनिष्ठ यांना संधी मिळाली. आमदाराला आठ फेऱ्या विमानाच्या फुकट आहेत. सभापतीला कंटाळा येईपर्यंत आहेत. मंत्रालयात कोणत्या मंत्र्यांनी आमदाराने नागरिकांना दालनात यायला पास नाही दिला तर थेट मला फोन करा, कारण पास मीच देतो. सगळ्या आमदारांच्या पगारावर सह्या माझ्या आहेत, असे राम शिंदे म्हणाले.