
म्हणाले,’कोणी काहीही म्हणो, पण..?
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणामुळे राज्यातील अनेक सत्ताधारी आणि विरोधक राजकीय नेते आपल्यातील मतभेद बाजुला सारत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी आवाज उठवत आहेत.
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दबावतंत्र वाढवत आहेत. अशातच मुंडे यांना भगवान गडाचा पाठिंबा असल्याचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे सांगितल्याने आता याला धार्मिक स्वरूप येत आहे. यावरूनच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, ‘कोणी काहीही म्हणो, पण दोषींवर कारवाई होणारच असे म्हटले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. पण मुंडे यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे म्हटले होते. तर त्यांच्या यात कोणताही हात नसताना राजीनाम्याची मागणी का? आणि कशासाठी असा सवाल केला होता.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र भगवानगडानेच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीकेची झोड उठली होती. यानंतर देशमुख कुटुंबीयांनी महंत शास्त्री यांची भेट गडावर जाऊन भेट घेतली होती.
यावेळी धनंजय देशमुख यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्यासमोर सगळी कागदपत्रे, पुरावे ठेवत बाजू मांडली होती. तर न्याय मागणाऱ्याला चुकीचे ठरवू नका असे आवाहन देखील धनंजय देशमुख यांनी महंत शास्त्री यांना केली होती. आरोपींची मानसिकता तपासूनच आश्वासन द्या असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.
आता प्रकरणावरून भाजप खासदास उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, या प्रकरणात कोणाची गय केली जाणार नाही. कोणी काहीही म्हणो, पण दोषींवर कावरवाई ही होणारच. आपल्या देशात लोकशाही असून येथे न्यायालयासमोर सर्वच समान आहेत. यामुळेच या प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल, असेही खासदास उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.