
मास्टार प्लान सांगितला..!
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्तांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीचा प्रमुख मुद्दा होता मिसिंग लिंक म्हणजे शहरातील अनेक जागा मालकांनी जागा न दिल्याने रस्त्यांची कामे झालेली नाहीत, त्याबाबतचा निर्णय घेणे.
पुणे शहरात वाहतूक कोंडी होत आहे, याच एक कारण वाहने वाढली असं आहे. पब्लिक ट्रान्स्फरकडे नागरिक शिफ्ट होत नाहीत. मेट्रोचे सर्व मार्ग सुरू होण्यास आणखी खूप दिवस लागणार आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते जागा मालकांनी जाग न दिल्याने होत नाहीत, म्हणजे मिसिंग लिंक. जागामालक जागा देत नाहीत त्यामुळे मिसिंग लिंकला अडचणी होत आहेत, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?
लवकर जागा ताब्यात घेण्यासाठी मदत करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुणे शहरात 33 मिसिंग लिंक आहेत, त्यात 15 कोथरूडमधील आहेत. त्या जागा ताब्यात घेण्यासाठी 850 कोटी लागणार पैसे लागणार आहेत, त्यापैकी अर्धे पैसे राज्य सरकार आणि अर्धे पैसे महानगरपालिका देईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
लवकरच पुण्यातील मिसिंग लिंकसाठीचा जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मिटेल. ज्या कोणाची जागा असेल त्यांना बोलून घेऊ. शहर वाढतच आहे. त्यामुळे शासनाकडे मागणी करून मागण्या मान्य करून घेऊयात. अतिक्रमण असेल किंवा ड्रग्स असेल यात नागरिकांनी दबाव आणणे गरजेचे आहे. पैसे नाहीत म्हणून पुणे महापालिकेचे कुठलेही काम आता थांबणार नाही, कात्रज कोंढवाबाबत लवकरच निर्णय घेऊन काम करेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.