सुरेश धसांचा PA असल्याचं सांगितलं, मराठा कार्यकर्त्यांनी धू धू धुतलं..!
मस्साजोगचे सरपंच सरंपच संतोष देशमुख हत्याप्रकरण लावून धरलेल्या आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगत पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा बनावट पीए मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी पैसे मागत होता
त्यानंतर मराठा समाजा कार्यकर्त्यांनी पीएला चांगलाच चोप दिला आहे.धाराशिव जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष विशाळ असे नाव आहे. आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याची बतावणी मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी पैसे गोळा करत असल्याची बतावणी त्याने केली. ही माहिती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी त्याला रस्त्यातच गाठला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. चोप देताच पैसे मागितल्याची कबुली देखील दिली . कार्यकर्त्यांनी सुरेश धस यांना ही फोन वरून संपर्क करत ही माहिती देखील दिली.
आमच्या अण्णाला बदनाम का केलं?
कार्यकर्त्यांनी बनावट पीएला रस्त्यातच अडवलं. गाडी अडवून त्याला चोप दिला. कशाला पैसे मागितले? कोणी सांगितले पैसे मागायला? कशासाठी पैसे मागत होता. अण्णाचं नाव वापरून पैसे मागतो. चोप देतात पैसे मागितल्याची कबुली दिली मात्र मी कोणाकडून घेतले नाही, असे त्याने सांगितले. मराठा मोर्चाचे पैसे कोणी मागायला सांगितले नाही मग आमच्या अण्णाला बदनाम का केलं? असं म्हणत कार्यकर्त्यांनी हात साफ करून घेतला. चोप देत पोलिसांनी हवाली केले.
व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल
कार्यकर्त्यांनी सुरेश धस यांना ही फोन वरून संपर्क करत ही माहिती देखील दिली. सुरेश धस यांनी त्याला आष्टीला घेऊन येण्याचे सांगितले. समोर आणा मी त्याला बघतो असे सुरेश धस म्हणाले. मराठा तरुण पोलीस स्टेशनमध्ये जमले होते. एका अधिकाऱ्याकडे आशिषने पैसे मागितल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
