
राजकीय गोटात खळबळ…
राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
अशातच दिल्लीत कार्यक्रमात शिंदेंनी शरद पवारांचे कौतुक केले आहे. शिंदेंच्या या भुमिकेमुळं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार ही भारतीय राजकारणातील अशी व्यक्ती जी नेहमी आपल्या राजकीय खेळीने भल्याभल्यांना हैराण करते. पण एकनाथ शिंदेंबाबत वेगळ चित्र असल्याचे शिंदेंनी स्वतः म्हटलं आहे.
महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
...पण त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही
शरद पवारांचे कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले,शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा भाग्ययोग आहे.राजकीय क्षेत्राच्या पलीकडे चांगले संबंध कसे राखायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, शरद पवार हे राजकारणात गुगली टाकतात तेव्हा भल्याभल्यांची विकेट जाते पण त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही. शिंदेंच्या या वक्तव्यामुळं राजकीय गोटात चर्चांना उधाण आलं आहे. नाराजीच्या चर्चेत शिंदेंनी पवारांचे कौतुक केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
इतकेच नव्हे तर यावेळी शरद पवार अनेकदा त्यांच्याशी फोनवर चर्चा करत असल्याची माहिती शिंदेंनी यावेळी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला.