दैनिक चालु वार्ता बिड माजलगांव प्रतिनिधि -नाजेर कुरेशी
दिनांक 14/03/2025 रोजी छत्रपती शिवाजी चौक माजलगाव येथे इसम नामे अमोल बबनराव गावडे रा. पंचशीलनगर माजलगाव हा अवैधरित्या स्वतःचे ताब्यात तलवार बाळगून परीसरात दहशत माजवत असल्याची माहिती माजलगांव शहर पोलीसांना मिळाल्याने नमुद इसमाविरुध्द पोलीसांनी 18.05 वाजता छापा मारून त्यास तलवारीसह ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असुन अमोल बबनराव गावडे रा. पंचशीलनगर माजलगाव याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, नीरज राजगुरु पोलीस उपअधीक्षक उपविभाग गेवराई, अति. पदभार माजलगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक आकाश माकणे, पोहेकॉ / किशोर जाधव, पोलीस अंमलदार सुनिल गवळी यांनी केली आहे.
