
दैनिक चालु वार्ता शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
दोन दिवसांपूर्वी या गैरप्रकाराबाबत ससूनचे वैद्यकीय अधीक्षक श्री यल्लाप्पा जाधव यांच्याकडे हे गंभीर प्रकार कळवूूही रुग्ण आणी नातलगांच्या पदरी निराशाच”
नेहमी या ना त्या वादग्रस्त कारणांवरून चर्चेत असणारे पुणे येथील शासकीय ससून रुग्णालय हे पुन्हा एकदा वॉर्ड क्र ८ मधील ढेकणांच्या प्रकारामुळे आणि काही कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त गैरवर्तनामुळे चर्चेत आले आहे , काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एका रुग्णाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या, आता असाच एक नवीन प्रकार वॉर्डमध्ये “ढेकणांचा संचार” यामुळे समोर आला आहे, या रुग्णालयातील वार्ड क्रमांक आठ मध्ये इतर महिला रुग्णांसह कर्करोगाने त्रस्त महिला रुग्णांनाही उपचार करून/शस्रक्रिया करून ठेवले जाते,
खाजगी रुग्णालयात सर्वांनाच उपचार घेणे शक्य नसल्याने अनेक गरजू रुग्ण हे ससूनकडे महत्त्वाचा दुवा म्हणून पाहतात
परंतु तिथे मात्र आधीच ग्रस्त असलेल्या रुग्ण व नातलगांना एकीकडे ढेकूण त्रस्त करीत आहेत तर ९मार्च रात्रीला वॉर्ड क्रमांक ८ मध्ये ज्या परिचारिका कर्तव्यावर होत्या त्यातील काही परिचारिकांनी मात्र नातलगांशी अतिशय बेशिस्तपणे बोलून त्यांना त्रास दिलेला आहे, अशी कैफियत एका रुग्णाच्या मुलाने मांडली आहे त्याबरोबर त्या वॉर्ड मधील डॉक्टरांबाबत मात्र या नातलगाने समाधान व्यक्त केले आहे डॉक्टर चांगली सेवा देत आहेत, व्यवस्थित बोलत आहेत परंतु तेथील अस्वच्छता आणि “ढेकूण” हे खूप त्रासदायक ठरत आहे तर दुसरीकडे काही कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणामुळे ते त्रस्त झाले आहेत, कर्करोगासारख्या अशा काही आजारपणाचे संकट एखाद्या कुटुंबावर येते किंवा त्या रुग्णावर येते तेव्हा आधीच ते प्रचंड तणावांमध्ये असतात त्यांना गरज असती आधाराची त्यामध्ये रुग्णालयातील असे प्रकार त्यांना अजूनच कष्ट देतात,
अण्णापुर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी सदर प्रकरण समजल्यानंतर ढेकणांच्या या व्हिडिओसह वैद्यकीय अधीक्षक यल्लप्पा जाधव यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे, आता या “ढेकणांचा आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांचा” नक्की काय बंदोबस्त करणार ससूनचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक तथा ससून चे प्रशासन याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
एवढ्या वेळा गैरप्रकारांमुळे चर्चेत येवुन सुद्धा ससून मध्ये म्हणावा तशा सुधारणा का होत नाहीये? सर्वसामान्यांच्या जीवाची किंमत ससून अधिष्ठाता यांना गांभीर्याने वाटते? मध्यंतरी बातमीपत्रांतून एक गंभीर बाब समोर आली होती “ससून मध्ये एका रुग्णाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाला होता” आता “ढेकणांनी रुग्ण आणि नातलगांना परेशान केले असल्याची माहिती मिळाली, तसेच बेशिस्त कर्मचारी यांच्या मग्रुरीमुळे नातलग त्रस्त झाले आहे, प्रमुख बाब म्हणजे सदर प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक यांना कळविलेले असताना सुद्धा अद्याप पर्यंत तिथे उपाययोजना झाले नाहीत याचा अर्थ एकतर अधीक्षकांचे सुद्धा बेसिस्त कर्मचारी ऐकत नसावेत, किंवा लोकांचा जीव गेल्यानंतर च प्रशासन जागे होणार आहे का? याबाबत जनहित लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना व कारवाई न झाल्यास अधिष्ठाता यांनाच “ढेकूण” भेट देण्याची वेळ संबंधित प्रशासनाने आमच्यावर येऊ देवू नये ,
“निलेश यशवंत वाळुंज” (सामाजिक कार्यकर्ते/ व्हिसल ब्लोअर)