
दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण.
पुरंदर : सदरील भंडारा निर्मिती मशीन बालेवाडी येथे राहणारे श्री खंडोबा देवाचे भक्त श्री विलास दशरथ बालवडकर यांच्याकडून देणगी स्वरूपात देण्यात आलेली आहे.
सदरील भंडारा प्रसाद हा भाविक भक्तांना दर्शन झाल्यानंतर प्रसाद रुपी देण्यात येणार आहे.
तसेच भाविक भक्तांनी मंदिर मध्ये येतेवेळी भारतीय संस्कृतीचे पालन करणे हेतू भाविक भक्तांनी वस्त्रसंहीतेचे पालन करावे यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ठिकठिकाणी वस्त्र संहितेचे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. भाविक भक्तांनी यापुढे मंदिरात येतेवेळी भारतीय संस्कृतीप्रमाणे आपली वेशभूषा धारणा करावी असे आव्हान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे. विदेशी वेशभूषा असणाऱ्या भाविकांना मंदिरात येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे
जेजुरीगडावर भविकांना पारंपारिक वस्त्रसंहिता भविकांना नियम लागू केला असला तरी स्थानिक गुरव पुजारी कोळी घडशी यांना म्हणजे फक्त गुरुव पुजारी यांना सोवळे नेसने आवश्यक करणे यावर नियम असणे, गुटखा,तंबाखू गडावर खाणाऱ्यांची संख्या आहेच यावर बंदी कधी आणणार असा सवाल ही भविकांनी केला आहे
या दोन्हीही उपक्रमांचे उदघाटन दि. 10/03/2025 रोजी मंदिर गडकोटा मध्ये देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, विश्वस्त अनिल सौंदडे तसेच विशेष उपस्थिती मध्ये पंढरपूर देवसंस्थानच्या विश्वस्त ॲड. माधवीताई निगडे,देवसंस्थानचे व्यवस्थापक आशिष बाठे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन देवसंस्थानचे सेवेकरी वर्गाने केले.