
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूतील एक वैभव असलेल्या संत तत्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्ञान कर्म भक्तीयोग महाप्रवेशद्वार , तसेच चौदा टाळकरी कमानीस ,आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे.त्यामुळे या कमानींचे रूपच पालटले आहे.देहूनगर पंचायतीच्या वतीने या दोन्ही कमानींना प्रथमच किती तरी वर्षानंतर रंगरंगोटी करण्यात आल्याने देहूतील ग्रामस्थ देहूनगर पंचायतीचे कौतुक करीत आहेत.
देहूतील तत्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराज ,ज्ञान ,कर्म ,भक्तियोग महाप्रवेशद्वार , चौदा टाळकरी कमान , संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर ,वैकुंठस्थान मंदिर , नांदुरकीचा वृक्ष , भक्ती निवास , आणि गाथा मंदिरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण देहूनगरी व परिसर या विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे. एकूणच संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्या निमित्त संपूर्ण देहूनगरी सजून गेली आहे.लाखो वारकरी भाविक भक्त देहूनगरीत दाखल होत असून , आकर्षक अशा कमानी आणि विद्युत रोषणाईकडे कुतूहलाने पहात आहेत.