
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगांव रविवारी देहूनगरीत ३७६ वा श्री संत तुकाराम महाराज बीज सदेह वैकुंठगमन ३७५ व्या बीज सोहळ्याची वर्षपूर्ती अर्थात त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याचे सांगता आणि ३७६ वा श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी ( दि. १६ ) देहू नगरीत लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थित साजरा होत आहे.
३७६ वा बीज सोहळा निमित्त महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून वारकरी भाविक भक्त ,दिंड्या दाखल झाल्या आहेत.हरिनामाचा गजर , हरिपाठ ,भजन कीर्तन ,आणि टाळ मृदुंगाचा गजर यामुळे संपूर्ण देहूनगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे.
असे होतील धार्मिक कार्यक्रम
रविवार ( दि. १६ ) बीज सोहळ्यादिनी संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात पहाटे ३ वाजता काकड आरती , पहाटे ४ वाजता संत तुकाराम महाराज महापूजा व श्रींची महापूजा देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ यांचे हस्ते श्रींची पूजा, शिळा मंदिर महापूजा वंशज देहू / वारकरी यांचे हस्ते होईल. पहाटे सहा वाजता वैकुंठ गमन स्थान येथे पूजा होणार आहे. सकाळी १३ :३० संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांचा पादुका विविध फुलांनी सजवलेल्या पालखीतूत संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन मंदिराकडे हरिनामाच्या गजरात मार्गस्थ होईल. संत तुकाराम महाराज वैकुंठ सोहळ्या निमित्त हभप देहूकर महाराज मोरे यांचे सकाळी दहा ते बारा या दरम्यान कीर्तन सेवा होणार आहे.या ठिकाणी शासकीय आणि राजकीय नेत्यांच्या हस्ते आरती होईल.बरोबर बारा वाजता ,पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ,ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज की जय आणि हरिणाच्या गजरात लाखो वारकरी भाविक भक्त येथे असलेल्या नांदूरतिच्या वृक्षावर तुळशी ,पुष्पांचा वर्षाव करून हा बीज सोहळा याच देही याच डोळा अनुभवतील.त्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी पुन्हा दुपारी २ वाजता मुख्य मंदिरात येऊन दाखल होईल.त्या ठिकाणी देहू देवस्थानच्या वतीने वारकरी ,दिंडीकरी ,विणेकरी यांचा सन्मान करून प्रसाद देण्यात येईल.
नगरपंचायती कडून भाविकांचे स्वागत
देहूनगर पंचायतीच्या वतीने वारकरी भाविक भक्तांच्या स्वागताची जय्यद तयारी करण्यात आली आहे.वारकरी भाविक भक्तांना ,शुद्ध पिण्याचे पाणी ,फिरती शौचालय ,अखंडित वीज पुरवठा , प्राथमिक उपचार केंद्र ,इंद्रायणी घाट ,मुख्य मंदिर ,वैकुंठस्थान मंदिर व परिसरात स्वछता आशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.तर या बीज सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारीक नजर असणार .पोलिस प्रशासन , जिल्हा प्रसाशन ,तालुका व स्थानिक प्रशासनाच्या वतीने ,वारकरी भाविक भक्तांना कोणत्याही अडीअडचणी येऊ नयेत यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात आली आहे.एकूणच संत तुकाराम महाराज ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून हा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा हजारो लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थित पार पडणार असून ,संत तुकाराम तुकाराम महाराज ३७५ व्या अमृत महोत्सवी वैकुंठगमन स्फूर्ती सोहळ्याची सांगता होत आहे.